Breaking News

एकरकमी एफआरपीसाठी साखर आयुक्तालयात ठिय्या


पुणे/ प्रतिनिधीः राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या थकीत एफआरपीची रक्कम एकरकमीच मिळाली पाहिजे, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तालयात कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 


कारखान्यांवर कारवाईचे लेखी आश्‍वासनाशिवाय आयुक्तालयातून उठणार नसल्याची भूमिका ‘स्वाभिमानी’ने घेतली आहे. ‘स्वाभिमानी’चे प्रवक्ते योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील, बापू कारंडे, अमरसिंह कदम, संतोष ननवरे, प्रशांत बांदल, तुकाराम गावडे, लक्ष्मण जगताप, संदीप बालवडकर, शर्मिला येवले, राहुल सातपुते आदींसह अन्य शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.