Breaking News

मिरजगावला क्युप्रेशर शिबिराचे आयोजन


कुळधरण/प्रतिनिधी
भारतीय जैन संघटना, मिरजगाव व क्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग अ‍ॅण्ड ट्रिटमेंट संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे क्युप्रेशर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सदगुरू उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उध्दव नेवसे यांच्या हस्ते करण्यात आले. 

जैन संघटनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. क्युप्रेशर शिबिरास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अमृत लिंगडे, पंढरीनाथ गोरे, संजय शेलार, कैलास बोराडे, पप्पूशेठ कोठारी, बापूशेठ कासवा, सतिष कोठारी, धनचंद्र नहार, दिपक कोठारी, कुमारपाल नहार, संजय भंडारी, प्रितेश कटारीया, निलेश मुनोत, सुरजमल कोठारी, आशिष बोरा, सुनिल कोठारी, वैभव भंडारी, वृषभ भंडारी, सागर कटारिया, राजेंद्र सारण, जितेंद्र कुमार आदी उपस्थित होते.