Breaking News

सानिया पुनरागमनाच्या विचारातवृत्तसंस्था /हैद्राबाद :
भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आता आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रात 2019 च्या टेनिस हंगामात पुनरागमन करण्याच्या विचारात आहे.

32 वर्षीय सानिया मिर्झाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत सहा ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील दुहेरीचे अजिंक्यपद मिळविली आहेत. गेल्यावर्षी सानिया आणि तिचा पती पाकचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. गेल्यावर्षी सानियाने स्वत:ला टेनिसपासून अलिप्त ठेवले होते. एका मुलाची आई झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये खूपच बदल झाल्याचे जाणवते, अशी प्रतिक्रिया सानियाने व्यक्त केली आहे. सानियाच्या या मुलाचे नामकरण इझान असे करण्यात आले आहे.