Breaking News

प्रभागातील विकासासाठी सदैव कटिबध्द - गटाणी


पाथर्डी/प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून नाथनगर व विजयनगर भागातील नागरिकांची मुलभुत विकास कामासंदर्भात मागणी होती. वाढती मागणी व या भागाची गरज ओळखून आम्ही प्रभागातील मंजूर झालेल्या 7 पैकी तब्बल 6 नाथनगर व विजयनगर येथील गटारी पुर्ण केल्या आहेत. आगामी काळात देखील आ. मोनिका राजळे यांच्या माध्यमातून विकास कामे करण्याबाबत कटिबध्द राहु अशी ग्वाही पालिकेतील भाजपाचे गटनेते तथा प्रभाग क्र.4 चे नगरसेवक नंदकुमार शेळके व नगरसेवक संगिता संतोष गटाणी यांनी दिली.

पालिका निवडणुकीवेळी मा.आ.स्व.राजीवजी राजळे यांनी नाथनगर व विजयनगर भागातील नागरिकांना विकास कामासंदर्भात शब्द दिला होता. त्याप्रमाणे आ.मोनिका राजळे यांच्या माध्यमातून विकास कामे करण्यात येत आहेत. नाथनगर पुर्व भागामधील एकुण 18 पैकी यापुर्वी 8 गटारींची कामे करण्यात आली आहे. उर्वरित राहिलेल्या 10 पैकी 5 गटारींची कामे पहिल्या टप्प्यात करण्यात येत आहे. पुढील निधी उपलब्ध होताच नाथनगर व विजयनगर येथील राहिलेल्या गटरींची कामे करण्यात येतील. मागील वर्षभरामध्ये या भागात सुमारे 50 एलईडी दिवे लावले आहेत. तसेच शेवगाव रोड ते नगर रोडला जोडणारा नाथनगर मधील मध्यवर्ती असणारा रस्ता, शेवगाव रोड ते विजयनगरला जोडणारा मुंडे नगर येथील रस्त्याचे काम, मुंडे नगर येथील पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनचे काम, विजयनगर येथील खंडागळे यांच्या घराशेजारील भुखंड विकसित करण्याचे काम अवघ्या महिन्याभरात सुरू करणार आहोत. यांसह शनि महाराज मंदिरासमोरील मुख्य रस्ता, बंदिस्त गटार व पवार गल्ली येथील पुलाचा प्रश्‍न देखील सोडण्यासाठी पाठपुरावा चालु आहे. शहरातील अजंठा चौक, नाईक चौक, क्रांती चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक आदी मुख्य चौकाचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसह सुशोभिकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आगामी काळात देखील प्रभाग क्र.4 मधील नागरिकांना मुलभुत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता नाथनगर,विजयनगर या भागासह आष्टवाडा, आखारभाग, नवीपेठ, आदी भागामध्ये आ.मोनिका राजळे यांच्या माध्यमातून व नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे यांच्या सहकार्याने विकास कामांची घोडदौड चालु ठेवु असे शेवटी शेळके व गटाणी यांनी सांगितले.नाथनगर येथील बंदिस्त गटारींच्या कामांची पाहणी नुकतीच शेळके व.गटाणी यांनी केली. यावेळी पालिकेचे शहर अभियंता संजय गिरमे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गटाणी, प्रशांत शेळके, भगवान गायकवाड, संभाजी सोलाट, तानाजी सोलाट, पप्पु बनसोड, निजाम शेख यावेळी उपस्थित होते.