Breaking News

यात्रेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; वाहतूकीत बदल, छ. चौकाकडे एसटी वगळता सर्व वाहनांना बंदीसलग अकरा दिवस भरणार्‍या येथील वार्षिक यात्रेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस फौजफाटा पुसेगावमध्ये दाखल झाला आहे. यात्रेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी श्रीसेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने मुख्य रस्ता तसेच यात्रास्थळावर ठिकठिकाणी 20 सी. सी. टी. व्ही ची व्यवस्था करण्यात आली आहे. झेंडामिरवणुक रविवार दि 30 तसेच गुरूवार दि. 3 च्या मध्यरात्रीपासून व यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार दि. 4 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 या कालावधीत वाहन पार्कींग व वाहतूक व्यवस्थतेत तात्पुरता बदल करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक धीरज पाटील व पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक विश्‍वजित घोडके यांनी दिली.यात्रा काळातील अकरा दिवसांत जड वाहनांना पुसेगावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

यात्रेतील वाहतुकीवर नियंत्रण व नियोजन करण्यासाठी वाहतुक शाखेच्या पोलीसांची नेमणूक करण्यात आली आहे. गावाच्या चारीही दिशेने येणार्या वाहनांना अडथळा येणार नाही याची दक्षता वाहतूक पोलीस घेणार आहेत. सातारा बाजूकडून दहिवडी कडे जाणारी वाहने नेर,राजापूर कुळकजाई मार्गे तर दहिवडीकडून येणारी वाहने पिंगळी ङ्गाट्यावरून वडूज चौकीचा आंबा मार्गे व दुचाकी वाहने कटगुण,खटाव,खातगूण जाखणगाव मार्गे विसापूर फाट्यामार्गे साताराकडे वळवण्यात आली आहेत. तसेच वडूज बाजूकडून ङ्गलटणला जाणारी व येणारी वाहने खटाव ,जाखणगाव ,विसापूर ङ्गाटा ते नेर मार्गे वळवण्यात येणार आहेत.तर दहिवडी ते डिस्कळ जाणारी वाहतुक निढळ,मलवडी राजापूर मार्गे जातील. ऊस वाहतुक करणारी वाहने पुसेगावात न येता विसापूर ङ्गाटा चौकीचा आंबा मार्गे पळशी कडे वळवण्यात येणार आहेत.
वडूज रोड वरील गॅस एजन्सी कडून येथील छ. शिवाजी चौकाकडेजाण्याकरीता एस. टी बसेस वगळून सर्व वाहनानां बंदी घालण्यात आली आहे. चारही रस्त्याच्यादुतर्ङ्गा नो पार्कींग झोन ठरवण्यात आला असून अशा वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्‍वजित घोडके यांनी सांगितले. विसापूर ङ्गाट्याकडून शिवाजी चौकाकडे जाण्याकरीता सर्व वाहनानां बंदी घालण्यात आली आहे. निढळ रस्त्यावरील शिवराज मंगल कार्यालयाकडून शिवाजी चौकाकडे जाण्यार्या वाहनानां बंदी, ङ्गलटण दिशेकडून शिवाजी चौकाकडे जाण्यार्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे.जी वाहने वाहतुकीला अडथळा ठरतील त्यांना क्रेनच्या साह्याने उचण्यात येणार आहे.श्री सेवागिरी मंदिर परिसरासह छ. शिवाजी चौक, करमणूकीची साधने, बैलबाजार आणि यात्रा स्थळावरील बसस्थानके याठिकाणी पोलीस चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
पोलीसप्रमुख पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, व कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव विश्‍वजित घोडके बंदोबस्ताचे काम पाहणार आहेत. जिल्हा पोलीस कार्यालयातून यात्रा कालावधीसाठी यासाठी 1 डी. वाय. एस. पी. सपोनि व पोलीस उपनिरीक्षक मिळून 15 पुरूष पोलीस व महिला पोलीस 177, यामध्ये वाहतुक पोलीस कर्मचारी देण्यात आले आहेत. तसेच 300 होमगार्ड या व्यतिरिक्त दि. 4 जानेवारी रोजी रथाच्या मुख्यदिवशी 7 पोलीस अधिकारी व 135 पोलीस कर्मचारी यांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
यात्रेत घातपात होवू नये याकरता बॉम्ब शोध व नाशक पथक, घातपात विरोधी तपासणी पथक नेमण्यात आले असून गर्दीच्या ठिकाणी अत्याधुनिक सी.सी.टी व्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. महिलांच्या छेडछाड होवू नये, मालमत्तेचे संरक्षण, अवैद्य धंद्यावर कारवाई, गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण अधिकारी व कर्मचार्यांची पथके नेमली आहेत. रथोत्सवाच्या मुख्य दिवशी अतिरिक्त पोलीस कुमकही येणार असून त्या दिवशी गावातील वाहतूकमार्गात बदल केले जाणार आहेत.