Breaking News

मुस्लिम ओबीसी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अतिक बागवानराहुरी/प्रतिनिधी
आगामी निवडणुकीत मुस्लिम समाजाचे प्रश्‍न सोडविणार्‍यांच्या पाठीशी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना खंबीरपणे उभी राहील, असे प्रतिपादन संघटना जिल्हा संघटक शफीक बागवान यांनी केले. 

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी अतीक बागवान यांना निवडीचे पत्र देण्यात आल्यानंतर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जाकीर शेख होते. बागवान म्हणाले, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात काम चालू आहे. निम्याहून अधिक तालुक्यात निवडी करण्यात आल्या आहेत. उर्वरित तालुक्यात ही लवकरच या निवडी करण्यात येतील. सर्व निवडी होताच श्रीरामपुर येथे जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात येणार आहे. प्रारंभी हाजी फय्याज बागवान, शफीक बागवान, इकबाल काकर आदींचा शहाजी ठाकुर, अफनान आतार, अन्सार मुलानी, यांच्या हस्ते बुके तसेच शाल देवून सत्कार करण्यात आला. यावेळी काकर यांनी ऑर्गनायझेशनची पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. कार्यक्रमास ताहेर बागवान, बिलाल शेख, टायगर ग्रुप्सचे अध्यक्ष गणेश खैरे, अक्षय कोळपकर, जिशान शेख, सचिन मेहेत्रे, उमेश शेळके, जिल्लुभई शेख, इमरान सयद , महेश साळवे, दीपक कोल्हे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.