वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहनसातारा, (प्रतिनिधी) : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2018 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार्‍या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 ते 31 जानेवार 2019 पर्यंत पाठविता येणार आहेत. दि. 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालवधीतच प्रकाशित झालेली प्रथम आवृती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्व याधारण शाखा अथवा करमणूक शाखा)विनामुल्य उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि.1 ते 31 जानेवारी 2019 या विहित कालवधीतच पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक, प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक, प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव महाराट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी , मुंबई 400025 येथे पाठवाव्यात .
मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक, प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये प्रवशिका व पुस्तकांच्या दोन प्रती दि.1 ते 31 जानेवारी 2019 या विहित कालवधीतच पाठवाव्यात, असे आवाहन सचिव महाराट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, यांनी केले आहे. लेखक, प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर, पाकीटावर स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2018 साठी प्रवशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी 2019 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर दि. 1 ते 31 जानेवारी 2019 येणार्‍या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget