शबरीमला मंदिरात दहा महिलांचे दर्शनImage result for शबरीमला मंदिरात

तिरुअनंतपूरम/ मुंबईः
केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून राज्यात अजूनही तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आतापर्यंत दहा महिलांनी भगवान अयप्पांचे दर्शन घेतले असून त्याला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
केरळ पोलिसांचा एक व्हिडिओ एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या हाती लागला असून त्यात 1 जानेवारीला 3 मलेशियन महिला शबरीमला मंदिरात प्रवेश करताना दिसत आहे. या महिला तमिळ वंशाच्या आहेत. बिंदू आणि कनकदुर्गा यांनी यापूर्वीच भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले होते. 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. आणखी 4 महिलांनी दर्शन घेतल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. आता दर्शन घेतलेल्या महिलांची संख्या 10 इतकी झाली आहे. पोलिसांनी या सर्व महिलांची माहिती घेतली असून गरज पडल्यास त्यांना न्यायालयापुढे उभे केले जाऊ शकते. ज्या पोलिसांनी मलेशियन महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याची पुष्टी दिली होती, त्यांनी महिलांच्या शबरीमला दर्शनावरून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यास नकार दिला आहे.
ज्या 3 मलेशियन महिलांनी दर्शन घेतले आहे, त्यांचे नाव, वय आणि इतर माहिती पोलिसांनी आपल्याकडे ठेवली आहे. मलेशियन तमिळ समाजाच्या 25 सदस्यांचे एक पथक भगवान अयप्पांचे दर्शन घेण्यासाठी शबरीमला येथे आले होते. यातील 3 महिलांनी अयप्पांचे दर्शन घेतले. या तीनही महिलांनी दर्शन करताना शालीने आपला चेहरा झाकल्याचे व्हिडिओत दिसते. या महिलांनी 1 जानेवारीला पहाटेच मंदिराचा दौरा केला आणि सकाळी 10 वाजता त्या पांबा येथे परतल्या.
तत्पूर्वी, भाजपने शनिवारी राज्य सरकार लोकांच्या भावना भडकावत असल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण संवदेनशीलतेने हाताळण्याऐवजी स्थिती आणखी बिघडवली. त्यामुळे अनेक भाविक जखमी तर अनेक जण मृत्यूमुखी पडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget