Breaking News

मराठा समाजातील तरुणांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा ः लांबेराहुरी/प्रतिनिधी 
अखिल भारतीय छावा संघटनेचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील यांनी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन मराठा क्रांती मोर्चांचा दरम्यान अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा माध्यमातून मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या युवकांना व्यवसाय चालू करण्यासाठी व व्यवसाय वृद्धीसाठी विनाव्याजी कर्जपुरवठा करण्याचे आदेश सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याने सरकार दरबारी निवेदनाद्वारे तक्रार मांडली होती.

या निवेदनाची दखल घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा व्यवस्थापकीय संचालकांनी दखल घेतल्याचे पत्र लांबे पाटील यांना पाठवले आहे. पत्रात म्हंटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बँकांनी मराठा समाजातील तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी विनंती केली आहे. सदर बाबीस अनुसरून सादर करण्यात येत आहे की, महामंडळाच्या या योजनाअंतर्गत समाजातील बेरोजगार तरुणांना शीघ्र कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री महोदयांनी पदाधिकार्‍यांसमवेत बैठक बोलावून, महामंडळाच्या नवीन योजनांबाबत पूर्ण माहिती व योजनांची कार्यपद्धती सविस्तर मांडून राज्यातील सर्व बंकांच्या सर्व शाखांपर्यंत ही योजना पोहचविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान केले आहे.