Breaking News

मोदी सरकार देणार फुले दांपत्याला भारतरत्न?


नवीदिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पोतडीतून आणखी एक महत्त्वाचा निर्णय बाहेर येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब देण्याचा विचार सुरू आहे. 

येत्या 26 जानेवारीला यासंदर्भात अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील दलित नेते काशीराम यांच्या नावाचाही केंद्र सरकार भारतरत्न पुरस्कारासाठी विचार करत असल्याचे समजते.