Breaking News

दिव्या फाऊंडेशनच्या वतीने मोफत हेल्मेट वाटप पोलीस, पत्रकार व नागरीकांना दिले हेल्मेट


बुलडाणा,(प्रतिनिधी): दिवसांदिवस अपघातामध्ये लक्षणीय वाढ होत असुन रस्तयांवर होत असलेल्या अपघातामध्ये अनेक नागरीकांची दुर्दैवी मृत्यु होत आहे. रस्तयांवर होनणार्या अपघातांना आळा घाल्याण्यासाठी उपप्रादेशिक कार्यालय व जिला पोलीस प्रशासन द्वारे जिल्हायात 1 जानेवारी 2019 पासुन दुचाकी चालकाना हेल्मेट घालणे आवश्यक करण्यात आले. उपप्रादेशिक कार्यलय व जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे हेल्मेट सख्ती निर्णयच्या स्वागत सामाजिक संघटना दिव्या फाऊंडेशनच्या वतीने शहरातले पत्रकार, पोलीस कर्मचारी व सामान्य नागरीकांना हेल्मेट वाटप करून करण्यात आले. 

बुलडाणा जिल्ह्यात व विशेषत शहरात दुचाकी अपघातमध्ये चांगलीच वाढ दिसुन आली. दररोज रसत्यांवर होनर्या अपघातामध्ये दुचाकी चालकांच्या जिवावर बेदत आहे. उपरोक्त रसत्यांवर होणार्‍या अपघातांना आळा घालण्यासाठी व दुकाची चालकांच्या सुरक्षेची दृष्टीने जिल्ह्यात 1 जानेवरी 2019 पासुन हेल्मेट सख्ती करण्याच्या संदर्भात उपप्रादेशिक कार्यालय व जिल्हा पोलीस प्रशासन द्वारे निर्णय घेण्यात आला होता. उपरोक्त घेण्यात आलेल्या महत्वपुर्ण निर्णयाचे स्वागत करीत दिव्या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे यांच्या नेतृत्वात आज 1 जानेवारी रोजी शहरातले पत्रकार, पोलीस कर्मचारी तसेच सामान्य नागरीकांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी अशोक काकडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बि. बी. महामुनी व ठाणेदार यु.के.जाधव यांना बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात हेल्मेट भेट दिले. यावेळी दिव्या फाऊंडेशचे पदाधिकारी गजानन अवसरमोल, मोहसिन खान बिस्मिल्लाह खान, अशिष मोहरीर, फलदिप शेजोल, कुणाल खर्चे, प्रतिक शेजोल, मंगेश ठाकरे यांची उपस्थिती होती.