Breaking News

मनसे कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षपदी जाधव


पाथर्डी/प्रतिनिधी
परिवहन सेनेचे अध्यक्ष मा. हरी माळी यांच्या आदेशानुसार अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी श्याम जाधव तर विभागीय सचिवपदी शिरीष परदेशी यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी केली. तसे नियुक्तीपत्र अविनाश पालवे यांनी दिले आहे. 

यावेळी पालवे म्हणाले की, संघटना बांधणी व परिवहन कामगारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राज्य अध्यक्ष हरी माळी हे संपूर्ण राज्यभर दौरे करत आहेत. परिवहन कामगारांचे अनेक प्रश्‍न आहेत व ते फक्त मनसेच सोडवू शकते. जाधव व परदेशी म्हणाले की, आजही परिवहन कामगारांचा मनसेवर विश्‍वास असून लवकरच जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या बरोबर संपूर्ण जिल्हा दौरा करून प्रत्येक आगारात संघटना बांधणी करणार आहोत. यावेळी जिल्हाध्यक्ष पालवे यांनी दोघांचेही अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.