Breaking News

सोलापूर पोलिसांविरुद्ध मानवी हक्क आयोगाकडे तक्रार


सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या वेळी त्यांना काळे झेंडे दाखविणार्‍या काही कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करणार्‍या पोलिसांविरुद्ध असीम सरोदे (रा. पुणे) यांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना 4 ते 5 जणांनी त्यांना लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवले. घोषणा दिल्या. तेव्हा तेथे उभे असलेेल्या साध्या वेशातील पोलिसांनी घोषणा देणार्‍या लोकांना शिव्या देत लाथा बुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. यात मानवी हक्काचे उल्लंघन झाले असून त्यांना नुकसानभरपाईही देण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेत पोलीस अधीक्षक आणि पोलिस आयुक्त यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.