Breaking News

माजी सरपंचांनीच केला भ्रष्टाचार : साळुंखे


ढेबेवाडी (प्रतिनिधी) : उधवणे (ता. पाटण) येथील माजी सरपंच सौ. नीता साळुंखे, व तत्कालीन उपसरपंच यांनीच पंचायतीच्या कारभारात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप विद्यमान सरपंच विजय साळुंखे, उपसरपंच रामचंद्र साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. गेल्या पंचवार्षिकमधील पंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी संगमंताने शासकीय खात्यातील पैसे काढून तसेच गावातील गटर सफाईचे कोणतेही काम झालेले नसताना त्यांनी वेगवेगळया लोकांच्या नावे पैसे काढले व वाटप केले. 

तसेच याबाबतची त्यांनी खोटी कागदपत्रेही तयार केली आहेत. तसेच शांताराम साळुंखे हे सरपंचाचे सहाय्यक होते, त्यांच्या नावावर रुपये 11 लाखाची रक्कम चेकद्वारे काढण्यात आली होती. या सर्व आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावेळी पांडुरंग साळुंखे, हणमंत साळुंखे, रामचंद्र शिर्के, बजरंग शिर्के, युवराज कांबळे, बाळकृष्ण साळुंखे, गणेश साळुंखे उपस्थित होते.