कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही अन् करणारही नाही- रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांचे प्रतिपादन


फलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यात आपण कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही व करणारही नाही. हा तालुका समुध्दी व विकासाच्या मार्गावर नेहण्यासाठीच नेहमी पुढेच राहणार असल्याचे प्रतिपादन, राष्ट्रीय कॉगेसचे युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

फलटण तालुक्यातील राष्ट्रीय कॉग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा नुकताच येथील शुभारंभ लॉन्स येथे आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. फलटण नगरपरीषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, जि. प. सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर, कॉगेसचे प्रदेश प्रतिनिधी जयकुमार शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव फडतरे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे, शहराध्यक्ष अशोकराव जाधव, नंदिनी सावंत, शहराध्यक्षा स्विटी शहा आदी मान्यवर उपस्थीत होते.

रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, या तालुक्यात आपण स्वराजच्या माध्यमातुन दुध डेअरी ,साखर कारखाना पतसंस्था नव्याने उभ्या करून नावारूपास आणल्या व हजारो हातांना काम दिले आहे, आम्ही कधीही तालुक्यातील दुध संघ असो श्रीराम कारखाना असो की इतर सहकारी संस्था असो त्यांच्या बाबतीत व्यक्तीशः कधीही उचापती काढण्याचा प्रयत्न केला नाही कराण ते आमच्या रक्तात नाही या संस्था टिकल्या पाहीजेत कामगार टिकला पाहीजेत हीच आमची भूमिका, आहे सत्तेचा ताम्रपट कोणी घेवुन आले नाही. राजकारण हे निवडणुकीपुरते. तालुक्यातील कोणत्याही पक्षातील कार्यकर्त्यांने सांगावे की रणजितसिंहने त्यांच्यावर कधी अन्याय केलाय, कधी पोलीसांना सांगुन त्रास दिलाय. राजकारणामध्ये जे पावित्र्य ठेवावे लागते ते ठेवण्याचे काम आपण केले असल्याचे रणजितसिंह यांनी यावेळी सांगितले.

या तालुक्याने आपल्या घराला खुप काही दिले. माझ्या वडिलांना खासदार केले आणि मला वयाच्या 35 व्यावर्षी राज्यमंञी दर्जा असलेल्या महामंडळावर काम करण्याची संधी मिळाली. अजुन काम करायला भरपुर संधी आहे. मिळालेल्या वेळेत आपण प्रकल्प उभे केले. शेतकर्‍यांच्या हक्कासाठी उभा राहीलो. डेअरी, कारखाना काढला. नाईकबोमवाडी येथील एमआयडीसीसुध्दा मंजुर असुन ही एमआयडीसी आपण कोणत्याही परीस्थितीत करणारच आहोत , पण कोण काही नवीन करायला लागल की काहीच्या पोटात दुखतं. कारखाना काढायला लागलो तर आठवं आश्‍चर्य होईल म्हणातत, ज्यांनी एक ही संस्था काढली नाही एकही उद्योग उभा केला नाही उलट बापजाद्याच्या संस्था दुसर्‍याला चालवालया दिल्या, त्यांना बोलायला काय जातय असा टोमणाही शेवटी रणजितसिंह यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला. यावेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर,जिजामाला नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे ,बाळासोहब कदम, नानासो इवरे यांचीही भाषणे झाली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget