Breaking News

माजलगाव पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार गंमत भंडारी यांना तर ऍड.वसंतराव साळुंके यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर


माजलगाव, (प्रतिनिधी):- माजलगाव पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे दर्पण व समाजभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या वर्षीचा दर्पण पुरस्कार हा दैनिक पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांना तर समाजभूषण पुरस्कार प्रसिद्ध विधितज्ञ ऍड.वसंतराव साळुंके यांना जाहीर करण्यात आले असून हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दिनांक १४ रोजी राजस्थानी मंगल कार्यालयात शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. निलमताई गोर्‍हे तसेच जगद्विख्यात पत्रकार पी. साईनाथ यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न माजलगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणदिनाचे औचित्य साधून दरवर्षी दर्पण व समाजभूषण पुरस्कार देऊन तालुक्याचे नाव उंचावणार्‍या मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. मागील पाच वर्षांपासून ही परंपरा माजलगाव पत्रकार संघाचे कायम राखली असून या अगोदर डॉ. प्रकाश आनंदगावकर, ओमप्रकाश शेटे, मोहनराव सोळंके , गणेश सावंत , वैजनाथराव शिंदे, संजय मालानी आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. या वर्षी पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत संघर्षमय परिस्थितीत निर्भीड लेखणीच्या माध्यमातून माजलगावचे नाव उंचावणारे दैनिक पार्श्वभूमी चे संपादक गंमत भंडारी यांना दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच विधी क्षेत्रात माजलगाव चा झेंडा महाराष्ट्रासह गोवा राज्यात फडकवणारे प्रसिद्ध विधितज्ञ तथा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सलग चार वेळा सदस्य असलेले ऍड. वसंतराव साळुंके यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ. आर.टी. देशमुख हे असणार आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. निलमताई गोर्‍हे व प्रत्रकारिता क्षेत्रातील आशिया खंडातला एकमेव रोमन मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त पत्रकार तथा द हिंदू या वृत्तपत्राचे माजी संपादक पी. साईनाथ यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी माजी मंत्री प्रकाशराव सोळंके, मोहनराव जगताप, सभापती अशोकराव डक, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक , नगराध्यक्ष सहाल चाऊस, उपविभागीय अधिकारी प्रियांका पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश यादव, सचिव रत्नाकर कुलथे , जिल्हाउपाध्यक्ष सुभाष नाकालगावकर , पुरुषोत्तम करवा, पांडुरंग उगले, दिलीप झगडे, महेश होके, राज गायकवाड, शलेंद्र कुलथे आदींनी केले आहे.