Breaking News

संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात गोंधळ; पोलिसांचा लाठीमार


Image result for संभाजी भिडे

जालना/ प्रतिनिधीः
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या जालना येथील कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड आणि काही दलित संघटनांनी गोंधळ घातला.. जालन्यातील आर्य समाज मंदिरात भिडे यांची बैठक होती. कार्यक्रमस्थळी विरोध करणारे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी करणार्‍या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. 

गेल्या आठ दिवसांपासून शहरातील भिडे यांच्या नियोजित कार्यक्रमाविषयी माहिती ‘सोशल मीडिया’वरून फिरत होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि काही दलित संघटनांचा या कार्यक्रमाला कडाडून विरोध होता. सकाळी कार्यक्रमस्थळी या संघटना आल्या आणि त्यांनी भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. घोषणाबाजी करणार्‍या 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोंधळानंतर भिंडेचा नियोजित कार्यक्रम पार पडला. घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.