Breaking News

महाराष्ट्र केसरी बालारफीक शेखचा नगरमध्ये जंगी स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र केसरी ठरलेला बालारफीक शेख याचे नगर मधील राज चेंबर्स येथे जंगी स्वागत करण्यात आले. हाजी मन्सूर शेख व गुलशन उद्योग समुहाचे अफजल शेख यांनी बालारफीक शेखचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक मुद्दसर शेख, इम्रान शेख,उबेद शेख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, मा.नगरसेवक फैय्याज केबलवाला, हाजी मुस्ताक कुरेशी, डॉ.रिजवान शेख आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी बालारफीक शेख यांने कुस्तीमध्ये मिळवलेल्या यशाचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदृढ आरोग्यासाठी उपस्थित युवकांना व्यायामाचे आवाहन करीत, जीवनात ध्येय गाठण्यासाठी जिद्द, परिश्रम व सातत्य ठेवण्याचा संदेश बालारफीक ने दिला. तर या सत्काराने भारावल्याचे स्पष्ट केले