दुष्काळात शेतकर्‍याला एकाकी पडू देणार नाही-राजेंद्र मस्के


बीड (प्रतिनिधी)- बीड तालुक्यामध्ये दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत चाललेले आहेत ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल होऊन सरकारच्या दुष्काळी उपाययोजना ची वाट बघत आहे परंतु हे सरकार दुष्काळी उपाययोजना राबविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, अशा परिस्थितीत राजेंद्र मस्के मित्र मंडळ शेतकर्‍यांना एकाकी पडू देणार नाही असे मत युवा नेते राजेंद्र मस्के यांनी वरवटी येथे ग्रामस्थांनी बोलावलेल्या बैठकीत व्यक्त केले, यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गणेश तोडेकर, महेश सावंत, प्रदीप कोठुळे, अशोक सुखवसे, संपत कोठुळे हे उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र मस्के असे म्हणाले की दुष्काळामध्ये शेतकर्‍यांनी खचून न जाता या अस्मानी संकटावर मात केली पाहिजे त्याकरता सामाजिक क्षेत्रातील लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे, परंतु दुष्काळाचाही राजकारण करणारी काही मंडळी आपल्या जिल्ह्यामध्ये दिसून येत आहेत, दुष्काळासारख्या संकटाला तोंड देण्यासाठी भविष्यातील चारा टंचाई लक्षात
घेऊन राजेंद्र मस्के मित्रमंडळाच्यावतीने माजलगावच्या धरणात शेतकर्‍यांच्या पशुधनाला ओला चारा मिळावा यासाठी गाळपेरा मोहीम हाती घेतलेली आहे, हजारो एकर मध्ये हा गाळ पेरा करण्याचे काम सध्या सुरू आहे या मधून मार्च एप्रिल महिन्यामध्ये ओला चारा शेतकर्‍यांच्या पशुधनाला मिळणार आहे, हे काम आम्ही सामाजिक जाणिवेतून केलेले आहे व वरवटी हे गाव शहराच्या जवळ असून गावातील शेतकरी दूध उत्पादक शेतकरी म्हणून ओळखला जात आहे. आपल्याकडील मोठ्या प्रमाणात पशुधन आहे या पशुधनाला दुष्काळामध्ये जगवणे हे आपले कर्तव्य आहे, त्याकरता आपण अशा आसमानी संकटाला सामोरे जात असताना दुष्काळातील शेतकर्‍यांना त्याचा उपयोग व्हावा असे मत राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले. यावेळी गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget