Breaking News

संगमनेर येथे राष्ट्रीय चर्चा सत्रसंगमनेर/प्रतिनिधी
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिंनाक 8 व 9 जानेवारी 2019 रोजी इंडियन नॅशनल काँग्रेस आणि महाराष्ट्र राष्ट्रीय सभा आणि महाराष्ट्र 1885- 1947 या विषयांवर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी दिली आहे. 

या चर्चा सत्राचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री तथा विद्यमान आ. बाळासाहेब थोरात, संस्थेचे चेअरमन आ. डॉ.सुधीर तांबे यांचे अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संस्थेचे सेक्रटरी चंद्रकांत पा.कडलग, खजिनदार लक्ष्मणराव कुटे, संस्थेचे रजिस्ट्रार बी.आर.गवांदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. सतिष देशमुख तसेच चर्चासत्राचे बीजभाषण डॉ.बिंदा परांजपे बनारस हिंदू विदयापीठ, डॉ.सुजय सुवर्णकार मध्यप्रदेश, डॉ.हेमंत मालवीय, डॉ.सुरेश मिश्रा भोपाळ, डॉ.संदेश वाघ मुंबई विद्यापीठ, डॉ.नलिनी वाघमारे टिळक विद्यापीठ, डॉ.राधिका सेशन इतिहास प्रमुख, पुणे विद्यापीठ, डॉ.प्रशांत पुराणीक उजैन, डॉ, आत्माराम शिंदे नांदेड आदी उपस्थित राहून व्याख्यान देणार आहेत.

 तरी या चर्चा सत्रास अहमदनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील इतिहास प्रेमी नागरिक व इतिहास अभ्यासक प्राध्यापकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन इतिहास विभाग प्रमुख प्रा.नामदेव ढोणे, समन्वयक राष्ट्रीय चर्चासत्र व प्रा. त्र्यंबक राजदेव यांनी केले आहे.