भाजपच्या पदाधिकार्‍याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त; चॉपर, तलवारी, एअरगन, फायटर्स, चाकू, सुरे शस्त्रांचा समावेश


मुंबई : डोंबिवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी राहत असलेल्या भाजपाचा पदाधिकारी असलेला धनजंय कुलकर्णी याच्याकडून तब्बल 170 प्राणघातक हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. धनजंय कुलकर्णी हा भाजपाचा डोंबवलीचा शहर उपाध्यक्ष असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता देखील आहे. फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली दुकान थाटून खुलेआम शस्त्रास्त्रांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. मात्र क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने माहिती मिळताच त्याच्या दुकानावर अचानक धाड टाकून दुकानदाराच्या मुसक्या आवळल्या. 

आरोपी दुकानदार धनंजय हा डोंबिवलीतील टिळकनगर परिसरातील न्यू दिपज्योत सोसायटीत राहत असून त्याचे मानपाडा रोडला महावीर नगरातील अरिहांत बिल्डिंगच्या तळमजल्यावर तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघातक हत्यारांचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. त्यानुसार बोगस गिर्‍हाईक पाठवून क्राईम ब्रँचने प्रथम खात्री केली होती. त्यानुसार सपोनि संतोष शेवाळे, फौजदार निलेश पाटील, शरद पंजे, जमादार ज्योतिराम साळुंखे, हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिल्लारे, राजेंद्र घोलप, प्रकाश पाटील, हरिश्‍चंद्र बांगारा, राहुल ईशी यांनी सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक धाड टाकली. इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेली शस्त्रे विक्रीसाठी ठेवल्याचे पाहून पोलीसही अवाक झाले. रात्रभर या दुकानाची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी 1 एयरगन, 10 तलवारी, 38 बटनचाकू, 62 स्टील व पितळी धातूचे फायटर्स, 25 चॉपर्स, 3 कुर्‍हाडी, 9 गुप्त्या, 1 कोयता, 5 सुरे, 9 कुकर्‍या, मोबाईल, काही रोख रक्कम असा एकूण 1 लाख 86 हजार 20 रूपये किमतीचा शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला. आरोपी धनंजय कुलकर्णी हा कर्जबाजारी झाला आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून सदर दुकानात शस्त्रास्त्रे विक्री करत आल्याचेही समोर आले असून ही शस्त्रे त्याने मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, तसेच पंजाब, राजस्थान राज्यातून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget