वर्णवाद व मनुवादी वृत्तीने कारभार करणार्‍या भाजपा सरकार विरूध्द देशभर लढा उभारू : केशवचंद यादव
चिखली,(प्रतिनिधी): वर्णवाद घेवून, मनुवादी वृत्तीने भाजपा सरकार काम करीत असून त्याविरूध्द सर्व सामान्यांच्या मौलीक अधिकारासाठी काँग्रेस लढा देत आहे. काँगे्रस सरकारच्या काळात मनरेगा सारख्या योजनांमुळे गरीब रोजगारांच्या जीवनात चांगले दिवस आले.

काँगे्रसने देशात हरीतक्रांती आणली, त्यामुळे मोठ मोठी धरणे निर्माण होवुन देश सुजलाम-सुफलाम होवु शकला. त्याउलट भाजपा सरकारच्या कार्यकाळात रोजगार व कुटीरोद्योग कमी झाले, या सरकारच्या कारभारामुळे लोकशाही धोक्यात आली, संविधान धोक्यात सापडले, त्यामुळे या मनमानी कारभाराविरूध्द लढा द्यावा लागेल, त्यासाठीच देशातील युवकांचे प्रबोधन करून आणि त्यांना या लढयात सामील करण्यासाठी ही यात्रा संपूर्ण देशात गावोगाव फिरून युवकांना जागृत करीत आहे, असे उद्गार अखिल भारतीय युवक काँगे्रस अध्यक्ष केशवचंद यादव यांनी चिखली येथे बोलतांना काढले.

अखिल भारतीय युवक काँगे्रसच्या वतीने संपुर्ण देशभर युवक काँगे्रसच्या वतीने कन्याकुमारी ते जम्मु काश्मीर युवा क्रांती यात्रा काढण्यात आली असून या यात्रेचे चिखली येथे 9 जानेवारी रोजी आगमन झाले. 10 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता चिखली मतदार संघातील युवक कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधीत केले. सकाळी कडाक्याच्या थंडीतही या यात्रेच्या स्वागतासाठी मतदारसंघातुन हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती. यात्रेचे स्वागतासाठी आमदार राहुल बोंद्रे, जिल्हा युवक काँग्रेस मनोज कायंदे, चिखली विधानसभा अध्यक्ष रमेश सुरडकर, उपाध्यक्ष राहुल सवडतकर, प्रदिप ढोण, किशोर सोळंकी, शुभम पडघान, प्रसाद ठेंग, चिखली तालुका काँग्रेस अध्यक्ष विष्णु पाटील, शहर अध्यक्ष अतरोद्यीन काझी, डॉ.सत्येंद्र भुसारी, ज्ञानेश्‍वर सुरूशे, सोशल मेडीयाचे अ‍ॅड.प्रशांत देशमुख, डॉक्टर सेलचे डॉ.संजय घुगे, सचिन बोंद्रे, सेवादलाचे गजानन परीहार, मागासर्वीय सेलचे अर्जुन गवई यांच्यासह मतदार संघातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. देश पातळीवर निघालेल्या युवा क्रांती यात्रेत अखिल भारतीय युवक काँगे्रसचे अध्यक्ष केशवचंद यादव यांचे बरोबर उपाध्यक्ष श्रीनिवासजी, महासचिव प्रतिभा रघुवंशी, भैयाजी पवार, महाराष्ट्र युवक काँगे्रसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, प्रभारी मनिष चौधरी, प्रवक्ते आनंद दुबे, उपाध्यक्ष कुणाल राउत, आयटीसेलचे मध्यप्रदेशचे अध्यक्षा विभा बिंंदु डागोरे, प्रदेश महासचिव विजयसिंग राजपुत, यांचा समावेश असुन भारतातील विविध राज्यातील प्रातिनिधीक स्वरूपात सहभागी झालेले अनेक युवक कार्यकर्त्यांचा  सहभाग या यात्रेत दिसुन आला. यावेळी महाराष्ट्र युवक काँगे्रसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्रात नक्कीच काँगे्रसचे सरकार येणार असुन नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, राज्यस्थान व छत्तीसगडमध्ये काँगे्रसने युवक काँगे्रसच्या कार्यकर्त्यांना तिकीट देवून अत्यंत गरीब कार्यकर्त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली.

महाराष्ट्रातील युवक काँगे्रसचे संघठन त्या मानाने अगदीच जबरदस्त आहे. त्यामुळे युवक काँगे्रस राज्यात काँगे्रसला विजयी करून सत्तेवर बसविणार हे नक्की असे उद्गार काढले. यावेळी  युवक काँगे्रसचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी देशाचे पंतप्रधान मनकी बाते करते है, लेकीन जनकी बाते नही कर्ते है, त्यातही सर्रास खोटे बालायचे आणि  खोटी आश्‍वासने दयायची असे करत आहेत. कारण खोटी आश्‍वासने दयायला काहीच लागत नाही. परंतु त्यांचे हे खोटं आता जनतेसमोर उघड पडत असुन त्याचाच परीणाम तिन राज्यात भाजपाचा पराभव होण्यात झाला आहे. आता त्यांना महाराष्ट्रातील निवडणुकीत पुन्हा पराभावाचा सामना करावा लागणार आहे, असा टोला लगावला. 

      या युवा क्रांती यात्रेचे चिखलीत स्वागत करतांना चिखली विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल बोंद्रे यांनी कन्याकुमारी ते काश्मिर पर्यंत सरकारच्या खोटेपणाचा परदा, टराटर फाडुन काढीत ही यात्रा अनेक राज्यात फिरून आपल्या गावात पोहचली आहे. व येथुन पुढेही तिचा प्रवास देशभर होणार आहे, या दरम्यान भापजा सरकारचे सर्व कटकारस्थान आणि जनविरोधी निती लोकांसमोर उघडी पाडीत काँगे्रस पक्ष देशाला कसा विकासाच्या यशोशिखरावर घेवुन जाणार आहे, याचे मार्गदर्शक यात्रेतील सहभागी नेते मंडळी करणार आहे. त्याचे परीणामी आगामी निवडणुकीत युवक काँग्रेस हा उत्साह आणि उर्जा आता वादळ म्हणून भाजपाचा पानापाचोळा उडवील आणि  भाजपाचा पराभव होवुन काँगे्रस पक्ष पुन्हा सत्तेवर येण्यात येणार आहे, अशी खात्री उपस्थितांना दिली.  कार्यक्रमासाठी चिखली नगर परिषद सदस्य रउफभाई, आसिफभाई, गोकुळ शिंगणे, विजय गाडेकर, युवक काँगे्रस,एन.एस.यु.आय, डॉक्टर सेल, सेवादल, विधी सेल, मागासवर्गीय सेल, ओबीसी सेल, यांचेसह तालुका काँगे्रस व शहर काँगे्रसचे सर्व पदाधिकारी, मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget