Breaking News

सिध्देश्‍वर पुस्तके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार


रहिमतपूर : (प्रतिनिधी) शिक्षकांनी फुटीच्या राजकारणापासून दूर राहून समाजामधील शिक्षकांचे आदराचे स्थान कायम ठेवले पाहिजे. शिक्षकांनी आपापसातील वाट सोडून संवाद वाढवला पाहिजे. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच आपण शिक्षक संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख सिद्धेश्‍वर पुस्तके यांच्या सेवापुर्ती सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
 
यावेळी आ. बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. शिवाजीराव पाटील, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, बाळासाहेब सोळसकर, उद्योजक जयंत डोंगरे, चंद्रकांत जाधव, अ‍ॅड. अशोकराव पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, विठ्ठल जाधव, प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे, मनोज घोरपडे, संभाजी गायकवाड, नंदकुमार माने उपस्थित होते. यावेळी सत्कारमुर्ती सिध्देश्‍वर पुस्तके यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

ना. रामराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले की, नवी पिढी सर्वगुण संपन्न घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यामुळे माझ्या मनात शिक्षकांचे स्थान नेहमीच आदराचे राहिलेले आहे, आजही शिक्षकांचे अनेक प्रश्‍न असून ते सोडविण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी संघटनेच्या पाठीशी ताकतीने उभा राहीन. मा. आ. शिवाजीराव पाटील म्हणाले, आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला समोर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेला जनसमुदाय पाहिल्यानंतर खर्‍या अर्थाने समाधान मिळाले. शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी अहोरात्र झटणार्‍या सिद्धेश्‍वर पुस्तकेंवरील सर्वांची प्रेमाची ताकत त्यांच्या भावी आयुष्यास बळ देईल.

सत्काराला उत्त देताना सत्कार मुर्ती सिध्देश्‍वर पुस्तके म्हणाले, संघटना हीच शिक्षकांची ताकत आहे. त्यामुळेच मला सदैव काम करण्याची प्रेरणा मिळत गेली व काम करीत गेलो. ही ताकत माझ्या पाठीशी कायम राहू द्या. मी माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी लढत राहीन.

या वेळी बाळासाहेब सोळसकर, मनोज घोरपडे, सुनील माने, आ. शिवाजीराव पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी, सूञसंचालन सुरेश गायकवाड, संतोष जगताप तर आभार मोहनराव निकम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्चीतेसाठी रुपेश जाधव, सतिश जाधव, महेंद्र जानुगडे, राजेंद्र बोराटे, मच्छिंद्र मुळीक, विक्रम डोंगरे, समीर बागवान आदींसह शिक्षग संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व बहुसंख्य शिक्षक मोठ्या संख्येते उपस्थित होते.