Breaking News

दादा लेखराज यांना अभिवादन


नागठाणे (प्रतिनिधी) : जगभरात 143 देशात ध्यानधारणेद्वारे नैतिक मूल्यांचे शिक्षण देणार्‍या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाचे संस्थापक दादा लेखराज उर्फ प्रजापिता ब्रह्मा यांच्या 50 व्या स्मृतिदिनानिमित्त येथील नवीन मराठी शाळा नागठाणे येथील 400 विद्यार्थ्यानी दादा लेखराज उर्फ प्रजापिता ब्रह्मा यांचे मुखवटे घालून ध्यानधारणा करून त्यांना अभिवादन करून विश्‍वविक्रम केला. याची नोंद ग्लोबल रेकॉर्डस ऑफ द वर्ल्डमध्ये झाली आहे. 

आमदार बाळासाहेब पाटील यांनी ग्लोबल रेकॉर्डसबाबतचे प्रमाणपत्र बी. के. सुवर्णाबहेन, बी के डॉ दीपकभाई हारके, शाळेचे अध्यक्ष डॉ सुधाकर बेंद्रे, उपाध्यक्ष बाळकृष्ण साळुंखे, मुख्याध्यापक जयवंत कणसे यांना प्रदान केले. सुवर्णादीदी यांचा हा 36 वा तर डॉ दीपक हारके यांचा हा 100 वा विश्‍वविक्रम आहे.