Breaking News

अनंत इंग्लिश स्कुलचा आजपासून अनंतोत्सव सोहळा

सातारा (प्रतिनिधी) : येथील अनंत इंग्लिश स्कुलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अर्थात अनंतोत्सव गुरुवार दि.10 पासून रविवार दि. 13 जानेवारीपर्यंत साजरा होणार आहे.

गुरुवारी सकाळी 8 वाजता आ. रा. भोसले विद्यालयाच्या शाळाप्रमुख जयश्री उबाळे यांच्या हस्ते या सोहळ्याचा प्रारंभ होणार असून यावेळी अजित साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शुक्रवार, दि. 11 रोजी सायंकाळी साडेचार वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार असून प्रमुख पाहुणे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख व माध्यमिक शिक्षनाधिकारी राजेश क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. सातारा एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन डॉ. चेतना माजगावकर या अध्यक्षस्थान भूषावणार आहेत. 

शनिवार, दि. 12 रोजी सकाळी 8 वाजता क्रीडा व अन्य स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शरीरसौष्ठव स्पर्धेचे आशियायी पंच राजेंद्र हेंद्रे व पालिकेचे आरोग्य सभापती यशोधन नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. अध्यक्षस्थानी सोसायटीचे कार्यवाह चं. ने. शहा भूषावणार आहेत. रविवार दि.13 रोजी सकाळी 8.30 वाजता समारोप होणार असल्याची माहिती प्राचार्य एस. एम. शेख, उपशालाप्रमुख जे. एच. जाधव आदींनी केले आहे.