Breaking News

राहुल गांधी यांना महिला आयोगाची नोटीस


नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रक्रियेवरून काँग्रेसचे अधक्ष राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आता राहुल चांगलेच अडचणीत आले आहेत. पंतप्रधान एका महिलेच्या मागे लपत आहेत, असे वक्तव्य राहुल यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. 

राहुल गांधी यांनी एका रॅलीला संबोधीत करताना नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. “राफेल मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पळ काढत आहेत आणि बचावासाठी संसदेत एका महिलेला पुढे करत आहेत’ अशी टीका राहुल यांनी केली होती. 

राहुल यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा वर्मा यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. “राहुल गांधी यांचे वक्तव्य महिलांच्या विरोधात आहे. राहुल गांधी देशाच्या संरक्षण मंत्र्याला कमजोर समजत आहेत.’’ असे वर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.