Breaking News

चिकाटीने काम केल्यास ओळख मिळेल : सर रिचर्ड जॉन रॉबर्टस


मुंबई : आपण निवडलेल्या करिअरबाबत लोक काय म्हणतील, करिअरमध्ये यश मिळेल की नाही याचा विचार करण्यापेक्षा निवडलेल्या क्षेत्रात चिकाटीने काम करीत राहिलात तर तुमच्या कामामुळे तुम्हाला ओळख मिळेल, असे प्रख्यात नोबल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस यांनी दीक्षांत समारंभाच्या वेळी बोलताना सांगितले. प्रख्यात नोबल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज फोर्ट येथील मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरु रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलसचिव डॉ. सुनील भिरुड, डॉ. अर्जुन घाटुळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रख्यात नोबल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस यावेळी बोलताना म्हणाले, मी केलेल्या कामाबाबत मला सन्मान मिळेल की नाही यापेक्षा मी माझ्या नोबेल पारितोषिकामुळे मला वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो. समाजासाठी काय काम करणे आवश्यक आहे हे समजणे ही मोठी गोष्ट आहे. आजचे विद्यार्थी हे हुशार असून योग्य संधी कशी निवडायची हे माहीत आहे. मात्र असे जरी असले तरी आपल्या पारितोषिकाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी होणे हे जास्त महत्वाचे आहे.
दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.