काँग्रेसने सादर केलेली ऑडिओ टेप बोगस; पर्रिकर यांचा आरोप; आपण असे बोललोच नसल्याचे स्पष्टीकरण


पणजीः राफेलच्या फायली देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या घरात बेडरूममध्ये असल्याचा गौप्यस्फोट करणारी ऑडिओ टेप जारी करून काँग्रेसने खळबळ उडवून दिली असताना पर्रिकर यांनी अशा प्रकारचे कोणतेही संभाषण कुणाशीही झालेले नाही, असे स्पष्ट करत काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ऑडिओ टेपमध्ये जे संभाषण आहे, त्याला कोणताही आधार नाही. अशाप्रकारची कोणतीही चर्चा गोवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत वा अन्य कोणत्याही बैठकीत कधीही झालेली नाही, असे पर्रिकर यांनी नमूद केले. राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जो निकाल दिला आहे, त्याने काँग्रेसच्या खोटारडेपणाचा पुरता पर्दाफाश झाला आहे. त्यामुळेच आता नवे पुरावे तयार करण्याची केविलवाणी धडपड काँग्रेस करत आहे, असा आरोप त्यांनी केला. 


दरम्यान, काँग्रेसने जारी केलेल्या ऑडिओ टेपमध्ये पर्रिकर मंत्रिमंडळातील मंत्री विश्‍वजीत राणे यांचा आवाज असून त्यांनीही या टेपवर संशय व्यक्त केला आहे. या विषयावर मी कधीच कुणाशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे हा ऑडिओ बनावट असून याप्रकरणी चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राणे यांनी पर्रिकर यांच्याकडे केली 
आहे


Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget