Breaking News

बंधुत्व प्रतिष्ठानतर्फे खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन


सातारा (प्रतिनिधी) : येथील आधार सोशल ग्रुप, बंधुत्व प्रतिष्ठान, अष्टशील प्रतिष्ठान आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना प्रमाणपत्रासह गुणानुक्रमानुसार रोख बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत.

स्पर्धकांना निबंधलेखनासाठी प्रसार माध्यमांचे महान कार्य, आल्हाददायक स्वच्छंदी वातावरण, बुरसटलेल्या विचारांना तिलांजली, सर्वांगसुंदर समाजनिर्मिती, दारिद्य्र, अंधश्रध्दा, विषमता, व्यसनाधीनता व अज्ञान यांचे उच्चाटन, राजकारणातील नीतिमत्ता, मानवस्वभाव परिवर्तन, धर्मनिरपेक्षता एक नेता, संविधान महान देणे, समानता, कार्ल मार्क्स बंधुत्वाचा पुरस्कता स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे-मानसन्मान, आधुनिक नवभारत-समस्यांचे जाळे, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आदीपैकी कोणत्याही विषयावर एक निबंध 22 जानेवारीपूर्वी अनिल वीर, सुरभी हाईटस, जीवनज्योत हॉस्पिटलशेजारी, शनिवार पेठ, देवी चौक, सातारा या पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.