Breaking News

अमित शहांचे महाराष्ट्रातील कार्यक्रम रद्द

Image result for अमित शाह



नांदेड : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपले उर्वरित कार्यक्रम अचानक रद्द केले आहेत. अमित शहा नांदेड विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले आहेत. शहांनी ऐनवेळी आपले कार्यक्रम रद्द का केले, याबाबतची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही.

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले अमित शहा हे नांदेडमधील एका गुरूद्वाऱ्याला भेट देणार होते. तसंच स्थानिक कार्यकर्त्यांशी संवादही साधणार होते. पण सर्व कार्यक्रम रद्द करत त्यांनी दिल्ली गाठली आहे.

दरम्यान, रविवारी लातूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अमित शहा यांनी आक्रमक भाषण करत मित्रपक्ष शिवसेनेवर निशाणा साधला. त्यानंतर शिवसेनेनंही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं.