Breaking News

लोकशाही दिनात पाच तक्रार अर्ज प्राप्त


सातारा  (प्रतिनिधी): जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या उपस्थितीत झाला. या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये आज पाच तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित केलेल्या लोकशाही दिनास निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या अर्जामध्ये जिल्हा परिषद 1 व महसूल विभागाकडील चार तक्रार अर्जांचा समावेश आहे.