Breaking News

काँग्रेसला एकहाती सत्ता द्या : आ. पृथ्वीराज चव्हाण


मलकापूर (प्रतिनिधी) : मध्यंतरीच्या निवडणुकांमध्ये पाच राज्यांत ज्या पद्धतीने भाजपचा धुव्वा उडाला, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही भाजपचा पूर्णपणे धुव्वा उडेल. त्याची सुरुवात मलकापूर नगरपालिकेपासून करून काँग्रेसला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

मलकापूर पालिकेच्या निवडणुकीच्या काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रारंभावेळी ते बोलत होते. आ. आनंदराव पाटील, काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संजय बालगुडे, प्रदेश प्रतिनिधी अजित पाटील- चिखलीकर, हिंदुराव पाटील, एनएसयूआयचे माजी राज्याध्यक्ष शिवराज मोरे, माजी नगराध्यक्षा सुनिता पोळ, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महिला आघाडीच्या विद्या थोरवडे, इंद्रजित चव्हाण, उत्तमराव पाटील, मीना बोरगावे, जिल्हा परिषद सदस्या मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्या वैशाली वाघमारे, शंकर चांदे, नामदेव पाटील, वैभव थोरात, नितीन थोरात यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. 

ङी. चव्हाण म्हणाले, जिथे चावडीदेखील नव्हती तिथे आज सुनियोजित व आदर्श असे मलकापूर शहर बनले आहे. येथील 24 तास पाणी योजनेने पंतप्रधान पुरस्कारही मिळवला. देशातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून ही योजना पाहण्यासाठी लोक मलकापूरला भेट देत आहेत. मलकापूर देशपातळीवर नेण्याचे श्रेय (कै.) भास्करराव शिंदे व मनोहर शिंदे यांचे आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून लोकहिताच्या योजना राबवल्या. नाविन्यपूर्ण योजनेची दखल शासनाने घेऊन मलकापूर पॅटर्न केला. मलकापूर ही विकासाची प्रयोगशील शाळा करण्यासाठी शहराला सढळ हाताने निधी दिला. नगरपंचायतीची नगरपालिका करण्यामागे शहराचा गतीने विकास व्हावा हा उद्देश होता मात्र विकासाच्या आड येणार्‍या वृत्तीने ते अडवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना अनेकवेळा विनवणी करूनही काही साध्य झाले नाही. आमचा प्रामाणिक हेतू होता म्हणून उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि त्यांनी मलकापूर वासियांना न्याय मिळवून दिला. नरेंद्र मोदींनी फसव्या घोषणा केल्या या फिल्ममध्ये भ्रष्टाचार केला शेतकर्‍यांची फसवणूक केली नोटबंदी, जीएसटीसारखा चुकीचा निर्णय घेऊन व्यवसाय उद्योगधंदे बंद पडले अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. अशा सरकारवर विश्‍वास न ठेवता त्यांनी विकास घडवला त्यांना साथ द्या. मलकापूरची सूज्ञ नागरिक असून ते श्री शिंदे यांच्या पाठीशी उभे राहतील.
शिंदे म्हणाले, मलकापूरमध्ये दादांच्या आणि बाबांच्या विचारांमुळेच नाविन्यपूर्ण योजना साकार झाल्या. नगरपंचायतीचे पालिकेत रूपांतर करताना अनेकांनी आडकाठी घातली. मात्र, बाबांच्या पाठबळामुळे आज मलकापूर नगरपालिका अस्तित्वात आली.पालिके मुळे शहराच्या विकासाचा वेग वाढणार आहे. नेहमीच विकास कामात आड येणारी वृत्ती जनतेला माहीत असून निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवेल. ही प्रवृत्ती बाजूला सारून आम्ही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

आनंदराव पाटील, संजय बालगुडे, अजित पाटील, गुणवंत भोसले, राजू भोसले यांची भाषणे झाली. आनंदराव सुतार यांनी प्रास्ताविक केले राजेंद्र यादव यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर पवार यांनी आभार मानले.
पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकासाच्या वल्गना करणार्‍यांनी असणार्‍यांनी स्वतःच्या ताब्यातील असणार्‍या संस्थांचा करसुध्दा भरला नसून खर्‍या अर्थाने विकासाला खीळ घातली आहे. त्या कराची रक्कम तुम्ही जाहीर करता का मी जाहीर करू. असे आव्हान श्री. शिंदे यांनी केले.