Breaking News

खासदारकीसाठी शिर्डीतून अशोक गायकवाड इच्छुक; काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत युनायटेडचा समावेश


नगर/प्रतिनिधी
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व समविचारी पक्षांच्या आघाडीत युनायटेड रिपब्लिकन पार्टीचा घटक पक्ष म्हणून सहभागी झाला असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघाची जागा लढविण्यासाठी आघाडीकडे मागणी करण्यात आली. असल्याचे पक्षाचे संस्थापक अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी पत्रकार परिषदेस भाऊसाहेब पगारे, नाना पाटोळे, राजेंद्र साठे, राजेंद्र वाघ, अंकुश बहिलुमे उपस्थित होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये आघाडीत आपल्या युनायटेड पक्षाचा सहभाग झाला आहे. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिर्डी लोकसभा मतदार संघातून स्वतः अशोक गायकवाड हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. हेही दोन्ही पक्षांच्या नेत्याच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आपण ही निवडणूक लढविणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.