Breaking News

निलेश लंके प्रतिष्ठानने घडविले पारनेर तालुक्यातील भावीक भक्तांना माता वैष्णोदेवी दर्शनपारनेर/प्रतिनिधी

लोकनेते निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित, माता वैष्णोदेवी यात्रा आयोजित केली होती. पारनेर तालुक्यात धार्मिकतेची परंपरा जतन करत सामाजीक बांधीलकी जोपासनारे निलेशजी लंके हे गेले अनेक वर्षे नवरात्र उत्सवात महिला देवदर्शन व डिसेंबर महिन्यांत माता वैष्णोदेवी यात्रेचे नियोजन करत असतात.

सालाबादाप्रमाणे याही वर्षी नवरात्रात पाच दिवसात 70 हजार महीला माता भगीणींना मोहटा देवीचे दर्शन घडवीले होते. व वैष्णोदेवी यात्रेसाठी तालुक्यातील 547 भक्तांना दर्शन घडविले.

दि.23 अहमदनगर रेल्वे स्थानकावरून वैष्णोदेवीला यात्रेचे प्रस्थाण झाले. पारनेर तालुक्यातुन अनेक तरूण वृध्द या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. 547 भाविक भक्तांसह वैष्णोदेवी यात्रेस अहमदनगर रेल्वे स्थानकावरून प्रस्थान करताना या भव्य यात्रा महोत्सवाचे औचित्य साधुन पारनेर तालुक्याचे दानशुर व्यक्तीमत्व, भिकाजी रेपाळे यांनी उत्तर भारतात माता वैष्णोदेवी व परिसरात भयंकर थंडीची लाट आसल्या कारणाने सर्व भाविक भक्तांना थंडी पासुन संरक्षण मिळावे म्हणून कानटोपी, मोजे, मफलर यांची मोफत वाटप करून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला. जम्मु रेल्वे स्थानकावर सुखरूप पोहचले असता यात्रेच्या नियोजनाबद्दल लोकनेते निलेशजी लंके साहेब व नियोजन कमिटीचे सदस्य एकत्र येत यात्रेस आलेल्या सर्व भाविक भक्तांना नियोजना संदर्भात मार्गदर्शन केले. माता वैष्णोदेवी दर्शन, शिवखुडी दर्शन, पटनीटॉप, अमृतसर,वाघा बॉर्डर करत परतीच्या प्रवासात निलेश लंके यांच्यावर प्रेम करणारे मुळचे हंगा गावचे व इंदोर येथे राजकीय, व्यवसायिक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविनारे पारनेर तालुक्याचे भुमीपुत्रे सुरेश गागरे, अनिल लंके, सुनिल लंके, संतोष लंके यांनी इंदोर मध्य प्रदेश येथून सुमारे दोनशे कि.मी.वरून येऊन यात्रेस गेलेल्या 547 यात्रेकरूंना खांडवा रेल्वे स्टेशनला जेवणाची व्यवस्था केली.