Breaking News

प्रा.पिंगळे लंडन येथील साईबाबा मंदिरांच्या व्यवस्थापनपदी


राहाता/प्रतिनिधी
शिर्डी येथील साई ब्रह्मनाद स्वरमंचाचे संस्थापक प्रा.रवींद्र पिंगळे यांची शिर्डी साईबाबा ऑर्गनायझेशन यु.के.या संस्थेच्या इस्ट हम व फोरेस्ट गेट लंडन येथील दोन साईबाबा सेवा केंद्रांच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी निवड झाली आहे. ते आपल्या सेवेत रुजू होण्यासाठी आज लंडन येथे रवाना झाले आहेत.

प्रा. रविंद्र पिंगळे यांनी या संदर्भात माहिती देतांना सांगितले की, माझ्या आयुष्यात जगप्रसिध्द लंडन शहरातील साईसेवा केंद्रात साईबाबांची दैनंदिन पूजा, आरती, अभिषेक, ध्यान आणि भजन यासारखी सेवा करण्याची मिळालेली संधी ही साईबाबांच्या कृपाशिर्वादानेच मिळालेली आहे. वर्षभरातील साईबाबांचे शिर्डी प्रमाणे विविध उत्सव व इतर हिंदू सण अशा सर्व कार्यक्रमांची जबाबदारी संस्थेने दिली आहे. मला संस्थेने निवास, भोजन, वाहन व सुमारे दीड लाख रुपये प्रतीमाह वेतन मंजूर केले असल्याची माहिती प्रा.पिंगळे यांनी दिली. मला माझ्या आयुष्यात अशी संधी कधी मिळेल याची कल्पना देखील केली नव्हती. परंतु केवळ साईबाबांच्या कृपाशिर्वादामुळेच ही संधी मला मिळाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आणि आता तर पूर्ण वेळ साई बाबांच्या सेवेसाठीच मला थेट लंडनला बाबांनी पाठविले असून आता मला पूर्ण वेळ बाबांच्या कार्याचा तेथे प्रचार आणि प्रसार करण्याची संधी बाबांनी दिली असल्याचे ते म्हणाले. प्रा.पिंगळे गेल्या अनेक वर्षापासून साईबाबा मंदिरात भजन सेवा देत असून देश विदेशात साई बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. साई ब्रह्मनाद स्वरमंचाच्या माध्यमातून मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका, पोलंड आदी देशात नियमित साईभजन सेवा नियमितपणे देत आहेत. प्रा. रविंद्र पिंगळे हे लंडन (इंग्लंड) येथे दोन वर्षे साईसेवेत रुजू होत असल्यामुळेदिलीप हरिभाऊ रोहोम यांनी शुभेच्छा देवून सत्कार केला.