Breaking News

कोरेगाव भीमा लढ्याची प्रेरणा घेऊन व्यवस्थेत परिवर्तन घडवावे दिलीप जाधव यांचे प्रतिपादन, बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने अभिवादन


बुलडाणा,(प्रतिनिधी): देशातील आजची भीषण परिस्थिती पाहता भीमा कोरेगावची प्रेरणा घेऊन देशात व्यवस्था परिवर्तन घडवावे, बुलडाणा जिल्ह्यातील जे लोक भीमा कोरेगाव येथे काही वैयक्तिक कारणास्तव जावू शकत नाहीत. त्यांना विजय स्तंभाला मानवंदना देता यावी या उदात्त हेतूने बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने मागील वर्षापासून सेनेच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, असे प्रतिपादन बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले.


येथील गांधी भवन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप जाधव, जेतवन बुद्ध विहाराचे भंते संघपाल, प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. सतीश खंडारे, आझाद हिंद संघटनेचे अ‍ॅड.सतीशचंद्र रोठे, मजदूर संघटनेचे अध्यक्ष मधुकर जोगदंड, गुरू रविदास समता परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे, बाबासाहेब जाधव, महार रेजिमेंटचे सेवानिवृत्त माजी सैनिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमापूर्वी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत समूह गीत गायन स्पर्धकांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अजितकुमार चोपडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.सतीश खंडारे, जिल्हाध्यक्ष डी. एस. वले, अ‍ॅड. सतीशचंद्र रोठे यांनी भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक रणसंग्रामावर प्रकाशझोत टाकला. तसेच बहुजन संघर्ष सेनेच्या विदर्भ प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा अ‍ॅड. रेखा कस्तुरे, जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्या रेखा जाधव, जिल्हा कार्याध्यक्षा सविता मोरे, सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर आसोलकर, ओमप्रकाश गोंधणे, फोटोग्राफर प्रशांत सोनोने यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडूबा बनसोडे व सदानंद मोरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बहुजन संघर्ष सेनेचे विभागीय अध्यक्ष सावजी जाधव, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अजित चोपडे, बहुजन संघर्ष सेनेचे अधिकारी, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गोंधणे, पी. एस. मेढे, जी. एल. सिरसाट, राम हिवाळे, भीमराव वानखेडे, लिलाताई नागरे, अरुण हिवाळे, संदीप म्हस्के यांनी परिश्रम घेतले. यावेळी समूह गीत गायन स्पर्धेमध्ये विजेत्यांना प्रथम बक्षीस 3001, द्वितीय 2001, तर तृतीय 1001 रुपयांचे बक्षीस वितरण केले. आभार सदानंद मोरे यांनी मानले.