गुप्तधनासाठी नऊ वर्षाच्या बालकाचा बळी


सोलापूर / प्रतिनिधीः
मंगळवेढ्यातील बहुचर्चित प्रतीक शिवशरण या 9 वर्षीय चिमुरड्याची हत्या नसून त्याचा नरबळी दिल्याचा प्रकार आता उघड झाला आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. स्वतःसह कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक व्याधीतून सुटका करण्यासाठी आणि गुप्तधनासाठी आरोपीने प्रतीकचा नरबळी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहणार्‍या प्रतीक मधुकर शिवशरण (वय 9) या शाळकरी मुलाचे गेल्या 28 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. त्यानंतर सहाव्या दिवशी माचणूर गावच्या शिवारात उसाच्या फडात प्रतीकचा मृतदेह निर्घृणपणे खून करून टाकलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्याच्या डोक्याचे केस संपूर्णत: कापलेले, डावा पाय पूर्ण तोडून गायब केलेला आढळून आला होता. तेथेच हिरव्या रंगाची चोळी, बांगडयही मिळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय बळावला होता. तपासादरम्यान जळालेले अवस्थेतील काळे रंगाचे कापड, अर्धवट जळालेले कागदाचे तुकडे, अंडरवेअरचा जळालेला अर्धवट तुकडा आदी गोष्टी सापडल्या. पुरावा नष्ट करण्यासाठी या गोष्टी जाळून टाकलेल्या असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. 

या गुन्ह्यात यापूर्वी मांत्रिक भरत शिवशरण आणि एक अल्पवयीन आरोपी अटकेत होता. त्यानंतर आता मुख्य आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली. मंगळवेढयाचे उपअधीक्षक दिलीप जगदाळे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार, मंगळवेढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर मोरे, गिरी गोसावी, अरुण सावंत आदींनी गुन्ह्याचे धागेदोरे उकलण्यात भूमिका बजावली. तब्बल अडीच महिन्यांनी या गुन्ह्याची उकल झाली. आरोपीला गजाआड करण्यात यश आले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget