शाळेच्या प्रांगणात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारसंगमनेर/प्रतिनिधी

संगमनेर शहरातील शाळेच्या प्रांगणात लग्नसमारंभासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची लाजिरवाणी घटना रविवार दि. 30 रोजी रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, येथील ज्ञानमाता विद्यालयाच्या प्रांगणात एका खाजगी समारंभासाठी अकोले येथूल दाम्पंत्य व त्यांची सात वर्षाची मुलगी आले होते.

लग्नसमारंभातील कार्यक्रमात व्यस्त असताना अज्ञात इसमाने त्यांच्या मुलीला बळजबरीने तेथून जवळच असलेल्या बास्केटबॉल मैदानाजवळील व्यासपीठाच्या मागे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बर्‍याच वेळाने आपली मुलगी दिसेनाशी झाली म्हणून आई वडिलांनी मुलीचा शोध सुरु केला. तेंव्हा बास्केटबॉल मैदानाजवळील व्यासपीठाच्या मागे मुलगी एकटी रडतांना आढळली. मुलीने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. मुलीच्या वडिलांनी ताबडतोब संगमनेर शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार पोनि. अभय परमार, सहा.पोनि. गोपाल उंबरकर आणि काही सहकारी घटनास्थळी हजर होऊन त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. त्यानंतर रात्री उशिरा अल्पवयीन मुलीच्या पित्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात नराधमाच्या विरोधात फिर्याद दिली. शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि क्र. 463/18 भादंवि कलम 376 (ए) (बी) तसेच सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 3(ब), 4 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोनि. अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहापोनि. जी.एस. उंबरकर करीत असून पोलिसांनी आरोपीच्या शोधात चौकशीसत्र आरंभिले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget