Breaking News

थोरातांच्या विचारांचा तालुक्यात प्रबोधनातून जागर रथयात्रेतून जनजागृती कार्यक्रम


संगमनेर/प्रतिनिधी
थोर स्वातंत्र सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी दुष्काळी तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून समृद्धी निर्माण करुन दिली. रचनात्मक कार्याचा विचार देणार्‍या स्व. भाऊसाहेब थोरातांचे विचार नव्या पिढीला मार्गदर्शक व ऊर्जा देणारे असून त्यांच्या कार्याची युवकांना माहिती व्हावी. यासाठी रथाद्वारे प्रबोधनातून जागर करण्यात येणार असल्याची माहिती संपर्क प्रमुख प्रा.बाबा खरात यांनी दिली आहे. 

स्व.भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात महत्वपुर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यानंतर सहकारातून अमृत उद्योग समूहाची निर्मिती करुन येथील जनतेच्या जीवनात खर्‍या अर्थाने र्स्थेर्य निर्माण केले. संपुर्ण जीवनभर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतला. आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शकता, दुरदृष्टी ही विकासाची चतुसुत्री संपुर्ण देशाला दिली. साहित्य, सहकार, शेती, पर्यावरण, जलसंधारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव कार्य केलेले भाऊसाहेब थोरात हे खर्या अर्थाने विकास पुरुष ठरले. 12 जानेवारी हा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिवस असून याकाळात संगमनेर तालुक्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. आ. बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली यावर्षी हा जयंती महोत्सव 10 ते 12 जानेवारी 2019 या काळात मालपाणी लॉन्स येथे होणार आहे. या जयंती महोत्सवाचा एक भाग म्हणून भाऊसाहेब थोरात यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी रथयात्रेचे आजोजन करण्यात आले आहे.