Breaking News

भिमसंग्राम संघटनेचा आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी भारिपला पाठींबा


मेहकर,(प्रतिनिधी): भिमसंग्राम सामाजिक संघटनेच्या वतिने खामगाव येथिल भारिप बहुजन महासंघाच्या बैठकित आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी जाहिर अधिकृत पाठींबा देण्यात आला. भारिप बहुजन महासंघाचे ध्येय धोरण व बहुजन समाजासाठी पक्षाचे योगदान बघुन हा पाठींबा देणाचा निर्णय संघटनेच्या विशेष महत्वपुर्ण बैठकित घेण्यात आला होता.

भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अ‍ॅड.बाबासाहेब आंबेडकर यांनी आता पर्यंत वंचित बहुन समाजासाठी उल्लेखनिय कार्य केले आहे त्यांच्या कार्यात योगदान देण्यासाठी हा पाठींबा जाहिर करत असल्याचे पत्र भिमसंग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांच्या वतिने संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विष्णु नवघरे यांच्या वतिने भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अशोकराव सोनोने यांना देण्यात आले. यावेळी भारिपचे जि.सचिव वसंतराव वानखेडे, विद्वत सभेचे मेहकर ता. अध्यक्ष दिपक पाडमुख, लोणार ता. अध्यक्ष संघपाल पनाड, भिमसंग्राम संघटनेचे मेहकर ता.अध्यक्ष मिलिंद मोरे ता. सरचिटनिस प्रदिप सरदार, शहर अध्यक्ष आदित्य घेवंदे, वसंत सरदार, शालिकराम गवई, यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.