Breaking News

कार्यकाळ संपल्याने सातभाईंचा अर्ज पालिकेत सुपूर्दराहुरी/प्रतिनिधी

एक वर्षाचा उपनगरध्यक्ष या पदाचा कार्यकाळ संपल्याने राहुरी नगरपालिकेच्या उपनगरध्यक्षा सुमती सातभाई यांनी आपल्या उपनगराध्यक्ष या पदाचा लेखी अर्ज पालिकेला सर्पुत केला असून यानंतर उपनगराध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. एक वर्षापुर्वी सुमती सातभाई यांना मा.खा प्रसाद तनपुरे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, डॉ. उषाताई तनपुरे यांच्या आदेशाने राहुरी पालिकेचे उपनगराध्यक्षपद बहाल करण्यात आले होते.

जनसेवा मंडळाच्या निवडुन आलेल्या प्रत्येक सदस्याला एक-एक वर्षासाठी उपनगराध्यक्ष पद देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडुन ठरला होता. यामध्ये प्रथम प्रकाश भुजाडी यांना उपनगरध्यक्ष पद देण्यात आले होते. यानंतर सुमती सातभाई यांना एक वर्षासाठी उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली होती. भुजाडी यांनी त्यांचा प्रभागात कामे केली तर सातभाई यांच्या कार्यकाळातही काहीशी कामे केले मात्र त्यांच्या प्रभागातील बुरुड गल्ली येथील रस्त्याची काम त्यांना मार्गी लावता आले नाही. तर दोन आठवडे भरापुर्वी सातभाई यांच्या उपनगराध्यक्ष पदाचा वापर त्यांचे चिरंजीव करत असल्याचे वृत्तपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्याने सातभाई यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चेला उधान आले होते. शेवटच्या कार्य काळात सातभाई यांचेपद वादग्रस्त ठरल्याचे शहरात बोलले जात होते.यामध्ये नुकताच सातभाई यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने सौ. सातभाई यांनी आज दि.31 डिसेंबर 2018रोजी आपल्या उपनगरध्यक्ष पदाचा राजिनामा पालिकेकडे सर्पुत केल्याने याबाबत चांगलेच चर्चाला उधान आले आहे.