खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी
जळगाव : चाळीसगाव येथील डॉ.उत्तम महाराज यांना डाबून ठेवणू, 25 लाखांची खंडणी मागतील्या प्रकरणी तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज लोहार व उद्योजक धिरज येवले यांना जळगाव न्यायालयाने आज दोषी ठरवले आहे. जळगाव न्यायालयाचे न्या. लाढेकर यांनी हा निकाल दिला असून शिक्षेसाठी 19 जानेवारी पासून पुढील युक्तीवाद होणार असल्याची माहिती डॉ. महाजन यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणातील तिसरे आरोपी चाळीसगावचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
जि.प.च्या माजी सदस्याचे अपहरण करुन 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी लोहार व येवले या दोघांना कोर्टाने दोषी ठरविले आहे. डॉ. महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिस अधिक्षक मनोज लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोहार यांनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी डांबून ठेवले होते. ही घटना 30 जून 2009 रोजी चाळीसगाव येथे घडली होती. दरम्यान, लोहार यांची जिल्ह्यातील कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. याप्रकरणी कोर्टाने निकाल दिला. त्यात लोहार व येवले या दोघांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. येत्या 19 जानेवारीला दोन्ही दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
Post a Comment