Breaking News

समाजकंटकाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन; संत भगवानबाबा मूर्ती विटंबनप्रकरणी मोर्चा

पाथर्डी/प्रतिनिधी  आराध्यदैवत श्री संत भगवानबाबा यांच्या मूर्तीची विटंबना करणार्‍या स्वप्नील शिंदे या समाजकंटकाचा प्रतिकात्मक पुतळा शहरातील नाईक चौकात जाळून पाथर्डी पोलीस स्टेशनला शांततेच्या मार्गाने तालुक्यातील विविध पदाधिकारी व तरुणांच्यावतीने मोर्चा नेऊन स्वप्नील शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी. अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले.


याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद कांबळे यांच्या पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील स्टुडिओमध्ये मूर्तीचे काम चालू असताना मुर्ती जाळण्याचा प्रयत्न केल्याने समस्त भगवान बाबांवर श्रद्धा असणार्‍यांना भाविकाच्या भावना दुखावल्या गेल्याने तालुक्यातील विविध पदाधिकार्‍यांच्या व तरुणांच्यावतीने पाथर्डी पोलीस स्टेशनला काढण्यात आला होता. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, मनसेचे अविनाश पालवे, शिवसेनेचे  भगवान दराडे, राजेंद्र शिरसाठ, संतोष जिरेसाळ, भाऊसाहेब धस आदी उपस्थित होते. पोलीस स्टेशनला आलेल्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी अनेक आंदोलनकर्त्यांचे भाषण केले. यावेळी प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनकर्त्यांना सामोरे जाऊन पोलिस उपनिरीक्षक दिनकर मुंडे यांनी एका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असेल. तर दुसर्‍या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करता येत नाही. अशी प्रशासनाने भुमिका मांडली. त्यावेळी आंदोलकानी गुन्हा दाखल करून घेत नाही तोपर्यंत पाथर्डी पोलीस स्टेशनमधून उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिनकर मुडे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली असता. त्यांना मिळालेल्या आदेशानुसार वरिष्ठ अधिकार्‍यांना अहवाल पाठवून दुपारपर्यंत गुन्हा दाखल करून घेऊ असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

 भगवानबाबा हे अठरापगड जातीचे श्रध्दास्थान

भगवानबाबा हे अठरापगड जातीचे श्रध्दास्थान भगवानबाबा हे अठरापगड जातीचे श्रद्धास्थान असून दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने त्यांच्यावर श्रद्धा असणार्‍या भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जाती जातीेमध्ये तेढ निर्माण करणारे कृत्य स्वप्नील शिंदे याने केले, असून त्याच्यावर कठोरातील कठोर करावी. याआधीही नगरमध्ये शिवाजी महाराज यांच्याबद्दल नगरसेवक श्रीपाद छिंदम याने अपशब्द वापरले होते. त्यामुळे अशा समाजामध्ये तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकाविरोधात शासनाने एक नियमावली तयार करून अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.