मोरणा विभागात रीडिंग न घेताच वीज बिले आकारल्याचा ग्राहकांचा आरोप


पाटण (प्रतिनिधी) : तालुक्यातील मोरणा विभागाच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील बहुतांशी गावातील वीज ग्राहकाना घरगुती वीजवापराची बीले मीटरचे रीडिंग न घेताच आकारली आहेत. याबाबत अनेक जणांना वीज वितरण कंपनीकडून मागील आणि चालू महिन्यातील रीडिंग एकच असणारी वीज बीले देण्यात आली आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा नमुना चव्हाट्यावर आला आहे.पाटण तालुक्यातील मोरणा विभागात पाचगणी, आटोली, मळे, कोळणे, पाथरपुज, बाहे, दीक्षी. पांढरेपाणी अणि पिनीचावाडा ही दुर्गम गावे आहेत. पावसाळ्यात या गावांना साधारण तीन महिने वीजपुरवठाच होत नाही. पावसामुळे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारीही जात नाहीत. त्यामुळे वरील गावांत पूर्णपणे अंधार पसरलेला असतो. 

भाकरीच्या पिठासाठी धान्य दळून आणणे आणि मोबाईल चार्जिंगसाठीही मोठी धावाधाव करावी लागते. असे असुनसुध्दा वरील गावातील विज ग्राहकांना गेल्या नोव्हेंबरपासून चालू आणि मागील महिन्यातील वीजमीटरचे रीडिंगचा तोच तो आकडा असलेली विज बीले हातात पडली आहेत. त्यातही भरीस भर म्हणजे तीन ते चार हजार रूपयांची ही वीजबीले एवढा मोठा वापर नसतानाही ग्राहकांच्या माथी मारली आह_ेत. काहींनी अशी अंदाज पंचे आलेली विज बील नाईलाजाने बँकेत भरली, मात्र अनेकजण अशा चार चार हजारांची बीले कशी भरायची? अशा विचारात आणि संकटात पडले आहेत, वेळोवेळी या गावांना वीजपुरवठा न होताच अवाजवी वीज बीलाची समस्या डोके वर काढताना दिसत आहे. याबाबत येथील राहिवाश्यांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधींसह वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना कळवूनही त्याचीकोणीही दखल घेत मोरणा खोर्‍यातील पाचगणी आणि परीसरातील गावांच्या अनियमित वीजपुरवठा आणि अवाजवी विजबिलाबाबतच्या तक्रारी कायम असून त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी मागणी वीजग्राहकांतून होत आहे. 

आमच्या दुर्गम गावांत कोणीही वीज कर्मचारी वेळोवेळी फिरकत नाहीत तसेच घरगुती विजमीटरचे वीज वापर रीडिंग प्रत्यक्ष न घेता ऑफीसमध्ये बसूनच अंदाजपंचे बीलआकारणी केली जात असल्याचा आरोप स्थानिक जनतेतून केला जात आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget