Breaking News

तब्बल १३ वर्षांनी भरली शाळाबीड : प्रतिनिधी
सन २००५ ची जि.प.शाळा पिंपळनेर दहावी ची बॅच आज तब्बल १३ वर्षांनी एकञ आली. आनंदाला उधाण, जुन्या आठवणींना उजाळा,शालेय गमतीजमती, दहावीनंतर दुर गेलेले सर्व मिञ आज गेट टुगेदरच्या निमीत्ताने एकञ येऊन भेटले. विचारांची देवाणघेवाण झाली.प्रत्येकाने आपल्या आयुष्यातला शैक्षणीक, व्यावसायीक प्रवास कथन केला. यश, अपयश कथन केले. तसेच इथुनपुढे जमेल तसे सामाजीक, शैक्षणीक कार्यात योगदान देण्याचे सर्वांनी आपल्या मनोगतपर भाषणात सांगितले. जेवणं करुन आभार प्रदर्शन झाले व अतिशय आनंदात, समाधानात, मैञीपुर्ण वातावरणात आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम सुंदर अशा पद्धतीने पार पडला.