Breaking News

राफेल घोटाळा झालाच नाही तर, चौकशी का करत नाही-खा. अरविंद सावंत


राफेल प्रकरणावर झालेल्या चर्चेत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. जर घोटाळा झालाच नाही तर चौकशी का करत नाही असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारला केला. त्यामुळे राफेलच्या मुद्यावर शिवसेना विरोधीपक्षांसोबत असल्याचं चित्र स्पष्ट झालं.

आपल्या भाषणात अरविंद सावंत म्हणाले, "या प्रकरणात सरकारी कंपनीला डावलण्यात आलं. ज्या कंपनीला कामाचा काहीही अनुभव नाही त्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं. अरुण जेटलींचं भाषण मी ऐकलं, परंतू त्याने समाधान झालं नाही. लोकांच्या मनात संशय कायम आहे. तो संशय दूर झाला पाहिजे."

राफेलवरच्या चर्चेरम्यान भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये चांगलाच संघर्ष झाला. राहुल गांधी बोलत असताना भाजपच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांना एकदा सभागृह तहकूबही करावं लगाली. तर सरकारच्या वतीने उत्तर देताना अरुण जेटलींच्या भाषणादरम्यान काँग्रेसच्या खासदारांनी कागदी विमान त्यांच्या अंगावर भिरकावली. अध्यक्षांनी काँग्रेस खासदारांच्या या कृतीवर आक्षेप घेतला. शेवटी त्यांना सभागृह तहकूब करावं लागलं.