Breaking News

कल्याण-विशाखापट्टणम महामार्गाचे रखडलेले काम त्वरीत करा; नागरिंकांचा रास्ता रोको


पाथर्डी/प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 चे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले काम त्वरित पुर्ण करावे. तसेच या महामार्गाच्या बंद पडलेल्या कामामुळे आतपर्यंत तालुक्यातील अनेक लोकांचे जीव गेले आहेत. तर काहीजणांना अपंगत्व आले असून या गोष्टीला कारणीभुत ठरणार्‍या कंपनीच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत. संबधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे या मागणीसाठी तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वसंतराव नाईकचौकात तासभर रस्तारोको अांदोलन केले.

सकाळी 11 वाजता नाईक चौकात या रास्ता रोको करण्यात आला. कल्याण विशाखापट्टणम महामार्गाचे काम गेल्या चार वर्षापासुन सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गावर खडीचे ढिगारे व माती टाकण्यात आली आहे. केवळ एक जेसीबी, एक ट्रॅक्टर व तीन ढंपरच्या साहाय्याने सध्या काम सुरू आहे. वाळुंज, तनपुरवाडी, येथील पुलाचे कामे गेल्या एक वर्षापासुन अपूर्ण आहे. अकोला फाट्यावर खडी टाकून रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. काम दर्जेदार व वेळेत करावे यासाठी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापंर्यत 20 ते 25 अांदोलने केली. बुधवारी आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, पं.स. सदस्य सुभाष केकाण, बहुजन क्रांती पक्षाचे अ‍ॅड. सतीष पालवे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनटक्के, सुनिल पाखरे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नागनाथ गर्जे, अकोला ग्रामपंंचायतीचे उपसरपंच नारायण पालवे, माजी उपसरपंच उध्दव माने, ग्रा.पं. सदस्य संभाजी गर्जे, बाळासाहेब शिरसाट, बप्पसाहेब डुकरे, भास्कर दराडे, अविनाश टकले, अनिल पालवे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष गोरक्ष ढाकणे, यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी झाले होते. 

नायब तहसीलदार पंकज नेवसे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी अांदोलकांशी चर्चा केली. राष्ट्रीय महामार्गाचे नाशिक येथील सहाय्यक अभियंता यांच्याशी भ्रमणदुरध्वनीवरुन संपर्क साधला कंपनीवर कारवाई करण्यासाठी अहवाल मुंबई येथे सादर करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर अंदोलन मागे घेण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाच्या काम करणार्‍या ठेकेदार कंपनी व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी महामार्गाचे अधिकारी यांच्याबद्दल प्रवाशी व अपघातग्रस्त लोकांच्या मनात संतापाची भावना आहे. आंदोलनात अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी 20 ते 25 वेळा आंदोलने केली खुप आश्‍वासने मिळाली परंतु काहीच फरक पडत नाही. काहीही बोलायचे नाही आता केवळ बोंब ठोकतो असे म्हणुन सुनिल पाखरे यांनी केवळ बोंब ठोकुन कारवाई करा, अशी मागणी केली. दरम्यान पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी व नायब तहसिलदार पंकज नेवसे यांनी आंदोलकांच्या विनंतीस मान देत प्रत्यक्ष रखडलेल्या कामास ठेकेदारांच्या प्रतिनिधीनां सोबत घेऊन भेट देऊन पाहणी केली. व तातडीने काम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

आंदोलनकर्त्यांचे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न


प्रत्येक वेळी पोलीस प्रशासन, व तहसीलदार आंदोलनकर्त्याचे आंदोलन दडपण्याचे काम करत आहे. येत्या काही दिवसांत जर काम पूर्ण झाले नाही तर या पुढील आंदोलनाला समोरे जाताना पोलीस अधिकारी व तहसीलदारांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांना सोबत घेऊन यावे. 
- नारायण पालवे