Breaking News

माणचे प्रांताधिकारी कांबळे यांना पुरस्कार


म्हसवड (प्रतिनिधी) : माण खटावचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना नुकताच अनुलोम पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रशासकीय जबाबदारीच्या बरोबरीने पाणी फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची दखल म्हणून हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.