Breaking News

नागठाण्यातील रॉकी श्‍वानास प्रथम क्रमांक
नागठाणे : उंब्रज येथील ग्लोबल नॉलेज एक्स्पोच्या निमित्ताने आयोजित श्‍वान स्पर्धेत येथील युवराज साळुंखे यांच्या रॉकी या श्‍वानास प्रथम क्रमांक मिळाला. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. यावेळी महेश जाधव, डॉ. अशोक करांडे, विशाल शेजवळ आदी उपस्थित होते. श्रीरंग गोरे, आनंदराव नलवडे, इंद्रजित ताटे, प्रवीण गोरे, हंबीरराव गोरे, चंद्रकांत भोसले आदींनी श्री. साळुंखे यांचे अभिनंदन केले.