Breaking News

देना, विजया आणि बडोदा बँकेच्या विलीनीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी


नवीदिल्लीः देना, विजया आणि बँक ऑफ बडोदाच्या विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.भारतीय बँकिंग क्षेत्रातला हा महत्वपूर्ण निर्णय आहे. सप्टेंबर महिन्यात सरकारने हा निर्णय जाहीर केला होता. 

देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलीनीकरणानंतर ही बँक देशातील तिसर्‍या क्रमांकाची बँक ठरेल. अर्थसंकल्पात सरकारने सार्वजनिक बँकांचे विलीनीकरणाचे धोरण जाहीर केले होते. विलीनीकरणाच्या प्रक्रियेत बँकेच्या कोणत्याही कर्मचार्‍याला कमी केले जाणार नसल्याची ग्वाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली होती. सरकारी बँकांची वाढती थकित कर्जे, देशाच्या कानाकोपर्‍यात बँकिंग सेवा पोचवण्यासाठी असलेला रेटा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी बँकिंग क्षेत्राच्या अमूल्य योगदानाची अपेक्षा या पार्श्‍वभूमीवर विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता.